10. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार // इयत्ता सातवी पाठ १०वा // Swadhyay STD7 history chap.10 q&a
१. म्हणजे काय ?
(१) चौथाई –
‘चौथाई म्हणजे कोणत्याही सत्ठेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या एक चतुर्थांश भाग गोळा करण्याचा हक्क . चौथाई दौलातीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे
(२) सरदेशमुखी –
‘ सरदेशमुखी’ म्हणजे कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून जमा होणाऱ्या महसुली उत्पन्नाच्या एक -दशांश भाग वसूल करण्याचा अधिकार. सर्देश्मुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे
२. एका शब्दात लिहा.
(१) बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता….
उत्तर :- श्रीवर्धन
(२) बुंदेलखंडात याचे राज्य होते….
उत्तर:- राजा छत्रसाल
(३) या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यूझाला….
उत्तर:- रावेरखेडी
(४) पोर्तुगिजांचा पराभव यांनी केला….
उत्तर :- चिमाजी अप्पा
३. लिहिते व्हा.
(१) कान्होजी आंग्रे :-
कान्होजी आंग्रे हे मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख होते . कान्होजी आंग्रे यांनी महाराणी ताराबाईची बाजू घेतली व शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले . त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली . या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले . बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले .
(२) पालखेडची लढाई :-
बादशाहने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई – सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजामाचा विरोध होता . त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला . बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले . त्याने निजामाचा औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला .तेंव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला .
(३) बाळाजी विश्वनाथ :-
१) शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बालाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले
२) बाळाजी मुळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा .तो कर्तृत्ववान व अनुभवी होता .
३) शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत , हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहूमहाराजाकडे वळवले.
(४) पहिला बाजीराव :-
शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा बाजीराव ( पहिला ) याची इ.स . १७२० मध्ये पेशवेपदी नेमणूक केली . त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जाते. पेशावेपदाच्या वीस वर्षांच्या कालावधीत त्याने मराठ्याच्या सत्तेचा विस्तार विस्तार घडवून आणला . इ.स. १७४० मध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला
४. कारणे लिहा.
(१) मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
उत्तर :- १) मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहूमहाराजांनी मागितलेल्या छत्रपतीपदावरील हक्क ताराबींनी अमान्य केला .
२) पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली .
३) ताराबाईनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेऊन पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादि निर्माण केली
४) त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली
२) आझमशहाणे छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली
उत्तर :- १) औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादिसाठी संघर्ष सुरु झाला
२) शहजादा आझमशहा हा दक्षिणेत होता
३ ) बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला
४) शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादिसाठी कालः होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल , असे आझमशहाला वाटले
५) म्हणून त्याने शाहू महाराजांची सुटका केली
(३) दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.
उत्तर:- १) मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी , अफगाणी आक्रमणाची भीती वाटत होती .
२) तसाच आसपासच्या पठाण , राजपूत , जाट , रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता .
३) शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती .
४) यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहय्याच्ची गरज होती