१०. मानवी वस्ती स्वाध्याय प्रश्न उत्तरे  इयत्ता ७ वी 

१. थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा.

उत्तर – 

१) विकास प्रक्रियेनुसार – व स्ती, वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती

२) आकृतीबंधानुसार – विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, रेषाकृती वस्ती

(२) केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा.

उत्तर –

केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक पुढीलप्रमाणे आहे

केंद्रीय वस्ती

 (१) केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात. 

(२) केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोईसुविधा उपलब्ध असतात. 

३) केंद्रित वस्त्य[1] 366;ंमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते. 

 

 विखुरलेली वस्ती

१) विखुरलेल्या वस्त्यांमधील घरे एकमेकांपासून दूर असतात

२) विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नसतात

३) विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या मर्यादित असते.

(३) मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा.

उत्तर – पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल  परिस& #2381;थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात.

(४) मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा.

उत्तर – 

वस्त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले. त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या. उदा., समुद्रकिनाऱ्यावरील लोकांचा व्यवसाय मासेमारी. त्यांची वस्ती म्हणजे कोळीवाडा. वनप्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात.

(५) वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा.

उत्तर –

वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक पुढीलप्रमाणे आहे –

वाडी 

१) वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. 

२) वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदा., शेतकऱ्यांची वाडी

३) वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते. 

 

ग्रामीण वस्ती

१) ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंखî 1;या तुलनेने अधिक आढळते. 

२)  ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदा., शेतकरी, कोळी, कुंभार, व्यापारी, दुकानदार इत्यादी. 

 ३) ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते.

पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा.

१) शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते.

उत्तर – विखुरलेली

(२) वस्तीत साम ाजिक जीवन चांगले असते. 

उत्तर – केंद्रित

(३) रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात.

उत्तर – रेषाकृती

(४) ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते.

उत्तर – रेषाकृती

(५) प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात.

उत्तर – विखुरलेली

(६) ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. 

उत्तर – क 75;ंद्रित

(७) घरे दूरदूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते.

उत्तर – विखुरलेली

(८) घरे एकमेकांस लागून असतातत

उत्तर – केंद्रित

प्रश्न २. आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. 

 

(अ) ‘A’ वस्तीमध्ये पाच ते सहा घरे असून गावात इतर सुविधा नाहीत.

उत्तर – विखुरलेली वस्ती

 

(आ) ‘B’ वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी  बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे. 

उत्तर – नागरी वस्ती / केंद्रित वस्ती

 

(इ) ‘C’ वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत.

उत्तर –  ग्रामीण वस्ती/ रेषाकृती वस्ती

 

(ई) ‘D’ वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे. तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत.

उत्तर – केंद्रित वस्ती

 

* C ही रेखाकृती वस्ती आहे. ती तेथे विकसित होण्याची दोन कारणे सांगा.

उत्तर  – 

१) ‘C’ हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्यापाशी (कमी उंचीवर) आहे. 

२) ‘C’ या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे.