स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास पाठ बारावा साम्राज्याची वाटचाल। Swadhyay class 7 samrajyachi vatchal

१. एका शब्दात लिहा.

 (१) इंदौरच्या राज्यकाराभाची सूत्रे सांभाळणाऱ्या –

उत्तर :- अहिल्या बाई होळकर

(२) नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वांत कर्तबगार व पराक्रमी पुरुष –

उत्तर :- रघुजी भोसले

 (३) दिल्लीच्या गादीवर बादशाहाला पुनःस्थापना करणारे –

उत्तर :- महादजी शिंदे

 (४) दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे –

उत्तर :- नाना फडणवीस

२. घटनाक्रम लिहा.

(१) आष्टीची लढाई

(२) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व

(३) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला.

उत्तर :- १) मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व

२) इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला.

३) आष्टीची लढाई

३. लिहिते व्हा.

(१) अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे

उत्तर:- इंदोरच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुढील कामे केली

१) नवे कायदे करून शेतसारा व करवसुली निश्चित केली

२) शेतकऱ्यांना विहिरी खोडून देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या , तसेच तलाव-तळी निर्माण केली .

३) व्यापार – उद्योगाला प्रोत्साहन दिले

४) भारतातील महत्वाच्या धर्मस्थळावर मंदिरे , घाट , माठ , धर्मशाळा , पाणपोया यांची उभारणी करून देशात सांस्कृतिक ऐक्य स्थापण्याचा प्रयत्न केला

५) राज्यात शांतता व सुव्यवस्था राखून प्रजेला सुखी केले

(२) महादजी शिंदेंचा पराक्रम

उत्तर :- मुत्सद्दी आणि पराक्रमी महादजी शिंदे यांनी पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे  वर्चस्व इ प्रतिष्ठा पुन्हा निर्माण  केली

२) फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून रोहिले , जाट , राजपूत , बुंदेले यांना पराभूत केले .

३) इंग्रजांवर मत करून मुघल बादशाहाला पुन्हा गादीवर बसवले आणि इ.स. १७८४ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार पहिला.

४) गनिमी काव्याचीयुद्धनीती वापरून वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला  

 (३) गुजरातमधील मराठी सत्ता

(३) गुजरातमधील मराठी सत्ता

उत्तर:- १) सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा मुलगा त्रिंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला

२) खान्देरावाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला.

३) त्यानंतरच्या काळात गायकवाडांनी वडोदरा जिंकून तेथेच आपल्या सत्तेचे मुख्य ठाणे बनवले.

४) मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे- चर्चा करा

उत्तरे :- मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढीलप्रमाणे

१) महादेव शिंदे यांच्यासारख्या पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारख्या मुत्सद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला.

२) नैतृत्वगुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही.

३) मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली .

४) उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला .

५) याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला अ त्यांनी इ.स.१८१८ साली आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला .