७. मृदा स्वाध्याय 

१. पुढील तक्ता पूर्ण करा.

घटक

– मृदानिर्मितीमधील भूमिका

 

मूळ खडक

मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रकार ठरतो.

प्रादेशिक हवामान

रादेशिक हवामानानुसार मृदानिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खडकाच्या विदारणाच्या / अपक्षालनाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते.

 

सेंद्रिय खत

सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो.

सूक्ष्म जीवाणू

– सूक्ष्मजीवाणूंमार्फत मृत वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचे प्रमाण ठरते

 

 

प्रश्न २. कशामुळे असे घडते ?

(१) सह्याद्रीच्या पश्चिम भागात  बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते.

उत्तर – 

सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो.

(२) मृदेत ह्युमसचे प्रमाण वाढते.

उत्तर – 

मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अत 67;रेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते.

शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून-पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील.

(३) विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद घडते.

उत्तर – 

 1. विषुवृत्तीय प्रदेशात पावसाचे प्रमाण तसेच तापमानही जास्त असते.
 2. जास्त पाऊस व हवामान असणाऱ्या प्रदेशात मृदा  निर्मितीची प्रक्रिया जलद होते.
 3. यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद घडते.

(४) मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. 

उत्तर – 

 1. शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो.
 2. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. 

(५) कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ (धान) जास्त असतो.

उत्तर –

मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. तसेच कोकणातली हवामान तांदूळ या पिकासाठी उपयुक्त असल्याने कोकणातील मृदेत तांदळाचे (धान) उत्पादन होते.

(६) मृदेची धूप होते.

उत्तर –

 1. वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते.
 2. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यांमुळे मृदेची धूप होते.

(७) मृदेची अवनती होते.

उत्तर –

वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यांमुळे मृदेची धूप होते. मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते. यास ‘मृदेची अवनती होणे’ असे म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते.

प्रश्न ३. माहिती लिहा.

(१) मृदा संधारणाचे उपाय.

उत्तर – 

मृदेचे महत्त्व लक्षात घेता, तिचे संधारण करणे महत्त्वाचे आहे. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये, म्हणून शेतांना बांधबंदिस्ती करतात. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साहाय्याने बांध घालणे, अशी कामे मृदा संधारण विभागातर्फे केली जातात.

वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते. मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झì 8;ज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांधबंदिस्ती करणे, हा कार्यक्रम राबवला आहे; त्यामुळे पाणी अडवा-पाणी जिरवा’ ही योजना यशस्वी झाली. पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली; त्यामुळेही शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नालेजोडणी करणे यांसारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत.

मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत य ांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते.

शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून-पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील.

(२) सेंद्रिय पदार्थ

उत्तर – 

सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 

(३) विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का, याची माहिती मिळण्याचे ठिकाण.

उत्तर – 

 1. पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन – कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विदयापीठे या ठिकाणी माहिती मिळू शकते.
 2. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते.

 (४) वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व.

उत्तर – 

 1. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्त्वाची असते.
 2. नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते.
 3. शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वेकरून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते.
 4. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात.
 5. ज्या प्रदेशांत शेतीयोग्य मृदा नाही, त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते. उदा., सौदी अरेबिया,
 6. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते, त्या प्रदेशात अन्नधान्यì 6;ची स्वयंपूर्णता दिसते, त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते.

प्रश्न ४. मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा

प्रश्न मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा