इतिहास व नागरिकशास्त्र  वर्ग ७ 

स्वराज्याचा कारभार स्वाध्याय 

प्रश्न. 1. ओळखा पाहू.

1) आठ खात्यांचे मंडळ –

उत्तर :

अष्टप्रधान मंडळ

2) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते –

उत्तर :

हेर खाते

3) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग –

उत्तर :

सिंधुदुर्ग

4) किल्ल्यावर युद्धसाहित्याची व्यवस्था पाहणारा –

उत्तर :

कारखानीस

प्रश्न. 2. तुमच्या शब्दांत लिहा.

1) शिवाजी महराजांचे शेतीविषयक धोरण

उत्तर :

i) शेतकऱ्याच्या हिताकडे महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. जमीन महसूल हे स्वराज्याच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन होते.

ii) शिवाजीमहाराजांनी अण्णाजी दत्तो या कर्तबगार व अनुभवी अधिकाऱ्याच्या साहाय्याने महसूल व्यवस्था लावली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त महसूल गोळा केला जाऊ नये. अशाप्रकारची ताकीदही महाराजांनी अधिकाऱ्यांना दिली.

iii) त्याचप्रमाणे पडीक जमिनी लागवडीखाली आणण्याकरिता त्यांनी शेतकऱ्यांना उत्तेजन दिले.

iv) शत्रूसैन्याकडून रयतेच्या पिकांचे नुकसान झाल्यास तिला भरपाई दिली जाई. तसेच दुष्काळी परिस्थितीत जमीन महसुलात सूट दिली जाई. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बैलजोड्या, बी-बियाणे आणि शेतीची अवजारे पुरविण्यात यावी अशी अधिकाऱ्यांना महाराजांची आज्ञा होती.

2) शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते

उत्तर :

i) शिवरायांनी इतर राजांप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे, एवढी मर्यादित आकांक्षा बाळगून कार्य केले नाही.

ii) प्रजेला स्वतंत्र बनवणे, हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

iii) प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल, तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वागीन काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशांचे रक्षण केले पाहिजे, त्याचे भान त्यांना होते. म्हणून शिवाजी महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ता होते, हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते.

प्रश्न. 3. का ते सांगा.

1) शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले

उत्तर :

कारण – i) विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीत व्हावा.

ii) तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधले जावे.

iii) स्वराज्यातील राज्यकारभाराच्या सोईसाठी शिवाजी महाराजांनी त्याची आठ खात्यामध्ये विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापले.

 2) शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले

उत्तर :

कारण – स्वराज्य विस्ताराच्या कार्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्दी त्याचप्रमाणे सुरत व राजापुरचे इंग्रज वखारवाले हे शत्रू अडथळा निर्माण करीत असत. या त्यांच्या अडथळ्यास पायबंद घालण्याची आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची आवश्यकता होती म्हणून शिवाजीमहाराजांनी आरमार उभे केले.

प्रश्न. 4. ओघतक्ता पूर्ण करा.

ogha takta purna kra

उत्तर :- 

oghatakta purna kra uttar