स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र पाठ सहावा मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये।
१. शासनावर कोणते निर्बंध असतात, याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा
उत्तर:- शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म , लिंग , वंश , भाषा यावर आधारित भेदभाव करू नये .
शासनाने धार्मिक कर लादू नये
कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये
कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये
२. खालील विधाने वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.
(१) वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी जागा असतात….
उत्तर :- होय
(२) एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री- पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते ……….
उत्तर :- नाही
(३) शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात ………
उत्तर :- होय
(४) राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे ……..
उत्तर :- होय
३. का ते सांगा.
(१) ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचेसंरक्षण करणे.
उत्तर :- (१ ) ऐतिहासिक वास्तू , इमारती , स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे .
(२ ) संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे . या तत्वाच्या आधारे वास्तुसंरक्षण कायदाही संसदेने संमत केलेला आहे . म्हणून आपण ऐतिहासिक वास्तू , इमारती , स्मारके यांचे संरक्षण करावे , तसेच ते आपले कर्तव्यही आहे .
(२) वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते.
उत्तर:- वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योग्दानी दिलेले असते ; म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे . या भावनेने तसेच वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते .
(३) ६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
उत्तर :- कारण
१) ६ ते १४ वयोगटातील मुला-मुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे , परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. पालक त्यांना कामावर पाठवतात . त्यामुळे निरक्षरता वाढते.
(२) या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मुलभूत कर्तव्यही ठरवले आहे . म्हणून शासनाने ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे .
४. योग्य की अयोग्य का तेसांगा. अयोग्य विधान दुरुस्त करा.
(१) राष्ट्रध्वज जमिनीवर पडून देणे.
उत्तर :- योग्य विधान
(२) राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे.
उत्तर:- योग्य विधान
(३) आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे/कोरणे.
उत्तर:- हे विधान अयोग्य आहे , कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वर्षाचे जतन करणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे .
(४) सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे.
उत्तर :- हे विधान अयोग्य आहे ; कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आणि स्त्री-पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे . ते अमान्य करणे म्हंगे पुरुष श्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल . म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे
(५) सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे.
उत्तर :- योग्य विधान
५. लिहिते होऊया.
(१) संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत. ती कोणती ?
उत्तर :-
(१ ) शासनाने स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दयावे .
(२) स्त्री इ पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दयावे
(३) नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय योजना कराव्यात.
(४) पर्यावरणाचे रक्षण करावे
(२) भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल?
उत्तर :- (१) संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे . शासन नागरिकांमध्ये जात,धर्म, वंश,भाषा,लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही .
(२) संविधानाने अल्पसंख्य लोकसमूह, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत.
(३) नागरिकांमध्ये अधिकाराबाबत भेदभाव होऊ नये, अशी परिस्थिती निर्माण व्हावी,यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे.
(३) मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे का म्हटले जाते?
उत्तर:- (१) मुलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते; तर मार्गदर्शक लोकशाही मुल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.
(२) मुलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते. मार्गदर्शक तत्वांना कायद्याचे संरक्षण नसते, परंतु जनता शासनावर दबाव आणून हि तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते.
(३) मार्गदर्शक तत्वे हि सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत; परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही;म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले जाते.
६. पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात, हेउदाहरणासह लिहा.
उत्तर:- (१) वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे
(२ ) धूर ओकणाऱ्या गाड्या, कारखान्यांच्या चिमण्या , फटाके वाजवणे याला सामुहिक प्रयत्न करून आळा घालणे
(३) दूषित पाणी नदी मध्ये सोडू नये
(४) प्लास्टिकचा वापर बंद करणे
(५) रेन वॉटर हारवेस्तिंग करणे इत्यादी