१५ – आपल्या समस्या आपले उपाय  Aplya samasya Aple Upay. 

प्रश्न १ ला . तुमच्या वाक्यात उत्तरे सांगा.

अ ) तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का ?

उत्तर :- हो खूप वेळेस , आम्ही आमच्या गावात जत्रा भरते तेंव्हा जातो . आठवडी बाजार भरतो तेंव्हा जातो , रस्त्यावर खूप गर्दी असते तेंव्हा ,आम्ही खूप वेळेस रस्त्यावर जातो

आ ) रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ?

उत्तर:- सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर खूप गर्दी असते कारण सकाळी सर्वांना कामावर, शाळेत जाण्यासाठी निघावे लागते व सर्व कामे सकाळीच करावी लागतात व नंतर संध्याकाळी गर्दी पडते कारण जे शाळेत गेले होते , कामावर गेले होते ते सर्व परततात . अश्या प्रकारे रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी जास्त गर्दी असते .

इ ) नेमकी त्या वेळेलाच जास्त गर्दी का होत असे तुम्हाला वाटते ?

उत्तर :- सकाळी लोक कामाला जातात व संध्याकाळी ते घरी परततात म्हणून नेमकी त्या वेळेलाच जास्त गर्दी होते असे आम्हाला वाटते .

ई ) वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात ?

उत्तर:-  वाहतूक कोंडीमुळे गाड्यांचे हॉर्न चालू असल्याने ध्वनी प्रदूषण होते. पायी चालणाऱ्या लोकांना रस्त्यावरून जाण्यास अडथळ निर्माण होतो. इंधनाच्या धुरातून वायू प्रदूषण होते , अपघाताचे प्रमाण वाढते . अश्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात .

मुक्तोत्तरी प्रश्न 

१) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय-काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते ?

उत्तर:- १) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शक्यतो खाजगी वाहनाचा वापर कमी करावा किंवा टाळावा

२) रस्त्यावरील सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे

३) रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करू नये

४) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रक दिव्यांची चोख व्यवस्था जागोजागी असायला हवी

५) ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस असायला हवेत,

६)  गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाचच घाई करता कामा नये .

२) वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते ?

उत्तर :- वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण , ध्वनी प्रदूषण वाढते

खालील वाक्ये वाचा . तुम्हाला योग्य वाटत असेल तर ✔ अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर X अशी खुण करा .

१) एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे X

२) ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास , भर रस्त्यात वाहने उभे करून गप्पा मारणे X

३) दुकानात वस्तू आणण्यास गेल्यावर , आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे ✔

४) गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे X

तुमच्या मनाने उत्तरे सांगा

१) आपण कचरा कशला म्हणतो

उत्तर :- निरुपयोगी आणि टाकाऊ वस्तू ज्या वापरात येऊ शकत नाहीत अश्या वस्तूंना आपण कचरा म्हणतो .

२) घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात ?

उत्तर :- घरातील  कचऱ्यात भाजीचे देठ , कागद , टाकावू अन्न , पोलीथीनच्या पिशव्या , इत्यादी वस्तू असतात .

३) तुमच्या घरातील ओला आणि सुका कचरा कोणता ते सांगा

ओला कचरा :- भाज्यांचे देठ , खराब झालेले किंवा टाकाऊ अन्न , फळांच्या साली

सुका कचरा :- कागद , पेन , खोके , प्लास्टिक

४) तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कचर्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात

उत्तर :- वर्गातील कचऱ्यामध्ये कागदाचे कपटे  , पेन पेन्सिल , खोडरबराचे तुकडे या वस्तू असतात .

मुक्तोत्तरी प्रश्न 

१) कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात

उत्तर :- ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत, बायोगॅस  तयार होऊ शकते

सुका कचरा :-

२) काचेच्या वस्तू वितळवून दुसऱ्या गोष्टी तयार होऊ शकतात

३) कागदाच्या वस्तूंपासून पुन्हा कागद्निर्मिती होऊ शकते .

२) वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल ?

उत्तर :- १) वर्गात कचरा करू नये असा फलक लावणे

२) वर्गातील कागदाचे कपटे तसेच खौचे कागद कचरा पेटीत टाकणे

३) तसेच इतर कचरा सुद्धा जमिनीवर न तक्ता कचरा पेटीत टाकणे .

‘भटके कुत्रे’ या विषयावर चर्चा करा . याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा

उत्तर  :- १) रस्त्यावरील कुत्र्‍यांचे मालक कोण असतात ?

२) भटक्या कुत्र्‍याचा  बंदोबस्त कुणी करायचा ?

३)भटके कुत्रे चावले तर त्याचे परिणाम काय होतील ?

४) रस्त्यावरील कुत्रे मोठमोठ्याने का भुंकतात ?

५) रस्त्यावरील कुत्रे इतर माणसांच्या अंगावर का धावून जातात ?