Chapter 1 :- इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा

(१) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ……….. यास म्हणता येईल.

(अ) व्हॉल्टेअर   (ब) रेनेदेकार्त   (क) लिओपॉल्ड रांके   (ड) कार्ल मार्क

उत्तर :- आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल.

स्पष्टीकरणः

व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.

(२) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ ………. याने लिहिला.

(अ) कार्ल मार्क्स   (ब) मायकेल फुको

(क) लुसिआँ फेबर   (ड) व्हॉल्टेअर

उत्तर :- (ब) मायकेल फुको

(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा

(१) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल   – रिझन इन हिस्टरी

(२) लिओपॉल्ड व्हॉन रांके   – द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी

(३) हिरोडोटस   – द हिस्टरिज्

(४) कार्ल मार्क्स   – डिस्कोर्स ऑन द मेथड

चुकीची जोडी   योग्य जोडी

कार्ल मार्क्स – ‘डिस्कोर्स ऑनमेथड    कार्ल मार्क्स – ‘दास कॅपिटल

२. टीपा लिहा.

(१) द्वंद्ववाद

उत्तर:- जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती मांडली आहे.

हेगेलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची दोन विरोधी प्रकारांत वर्गवारी करावी लागते. उदा. खरे-खोटे, चूक-बरोबर, चांगले-वाईट. याप्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो.

या दोन्ही सिद्धांतांचा तर्काच्या आधारे ऊहापोह केल्यानंतर त्या दोन्हींचे सार ज्यामध्ये सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते.

(२) ॲनल्स प्रणाली

उत्तर:- राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळणसंपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाचअॅनल्स प्रणाली’ असे म्हणतात.

अॅनल्सम्हणजे वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन, सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारीअॅनल्स प्रणाली’ इतिहासकारांनी प्रथम विकसित केली  

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.

उत्तर:- १) इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.

२) स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.

३) इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.

४) सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले .

(२) फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे.

उत्तरः– १) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.

२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे हे पूरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पूरातत्त्वाचा प्रयत्न असतो.

३) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हटले आहे.४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा

४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा
purna sankalp chitra

५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

उत्तरःएकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनीवर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्यांच्या मते

१) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो

२) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावरमालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.

३) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.

४) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

(२) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तरःआधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये.

१) या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते.

२) हे प्रश्न भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात, त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.

३) या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.

४) मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.

(३) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?

उत्तरः- १) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पूनर्रचना होय.

२) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा यांनी मांडली.

३) त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

४) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था ह्या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.

५) १९९० नंतर ‘स्त्री’ हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच ‘स्त्रीवादी इतिहासलेखन’ असे म्हणतात.

उत्तर:- लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते

१) इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.

२) इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रेदस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे.

३) या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.

४) इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी.

५) जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दयायला हवा.

Thank you १. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा