स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास पाठ तेरावा महाराष्ट्रातील समाजजीवन।Swadhyay maharashtratil samajjivan
१. तक्ता पूर्ण करा
२. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.
उत्तर :-
समाजात शकून – अपशकून मानणे , शुभकार्यासाठी मुहूर्त पाहणे , जन्म्संस्कार्र तसेच मृत्युसंस्कर विधी करणे , नवस करणे , वंश वाढविण्यासाठी मुलाचे महत्व व मुलीला परक्याचे धन समजणे , दूध-दही-तुपाने देवांचा अभिषेक करणे , जात व धर्मभेद पाळणे , आंतरजातीय विवाहांना प्रतिबंद करणे इत्यादी अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत .
या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी , नेत्यांनी कार्य केले. स्वतःच्या अचारानाद्वारे जनजागृती केली . आपणही त्यांच्या पायावर पाय ठेऊन वागले पाहिजे . स्वतःचे आचरण बदलून समाजाला बदलण्यास प्रवृत्त केले पाहिजे .
३. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा.
उत्तर:-
आमच्या परिसरात गुढीपाडवा, नागपंचमी , होळी , रंगपंचमी , पोळा , दसरा , दिवाळी , नवरात्र , गणपती उत्सव इत्यादी सन-समारंभ साजरे केले जातात .
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र गुढ्या उभारल्या जातात . पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.
नागपंचमीला नागाची पूजा केली जाते . लाह्या – फुटण्याचा प्रसाद दिला जातो .
होळी या सणाला होळी पेटवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो . रंगपंचमीला रंग खेळतात . घर्री गोडधोड केले जाते .
पोळ्याला बैलाची पूजा केली जाते . बैलांना सजवले जाते .
सजवलेले अनेक बैल एकत्र आणून हा सण साजरा केला जातो/ यात्रा भरते . वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात . त्यांच्या मुळे शेत पिकते . त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सन साजरा केला जातो .
४. खालील मुद्द्यांच्या आधारेशिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा.
क्र. | मुद्दे | शिवकालीन समाज जीवन | सध्याचे समाज जीवन |
१ | व्यवहार | वस्तू विनिमय पद्धत होती | हाळणी नाण्यात व्यवहार होतात |
२ | चरे | गरिबांची घरे साधी,माती-विटांची असत . श्रीमंतांचे वाडे एक वा दुमजली असत | गरिबांची घरे पत्र्याची , सिमेंटची असतात . श्रीमंतांची घरे अनेक मजली व अलिशान असतात |
३ | दळणवळण | बैलगाडी , होडी , घोडी,गाढव | बस , रेल्वे , विमान,जहाजे |
४ | मनोरंजन | युद्धकला व विविध खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते. | ग्रंथ,सिनेमा,टी.व्ही.,रेडीओ ,मोबाईल ,व्हिदिओ गेम्स इत्यादी |
५ | लिपी | मोडी लिपी | देवनागरी लिपी |