स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र पाठ चौथा मूलभूत हक्क भाग-१ .। Swadhyay class 7 मुलभूत हक्क भाग-१
१. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेलिहा
(१) मूलभूत हक्क म्हणजे काय ?
उत्तर:-
संविधानाने स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. यालाच मुलभूत हक्क म्हणतो. ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायदयाचा दर्जा आहे. या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे.
(२) विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके/पदव्या दिल्या जातात ?
उत्तर:- १) समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणार्यांना शासन पद्मश्री , पद्मभूषण , पद्मविभूषण यासारख्या पदव्या देते . भारतरत्न हि आपल्या देशातील सर्वोच्य नागरी पदवी किंवा सम्मान आहे.
२) संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र , अशोक चक्र,शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात.
(३) चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे?
उत्तर:- बालकांचे शोषण थांबवण्यासाठी चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे?
(४) संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत ?
उत्तर:-
भारतीय नागरिकांमध्ये उच्च—नीच , श्रेष्ठ -कनिष्ठ, स्त्री-पुरुष असा भेद करून कुणालाही वेगळी वागणूक मिळू नये. कायदा सर्वांसाठी सारखा असावा यासाठीच संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत
३. खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत.
उत्तर:- कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होतात .
(२) सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकते.
उत्तर :- सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही .
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर:-
१) सभा स्वातंत्र्य
२) भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र
३) सभा आणि संघटनांचे स्वातंत्र्य