१४) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 

स्वाध्याय १ :-

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१ )        शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली ?

उत्तर: ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही’ अशी शपथ शिकारीला गेलेल्या राजाने घेतली.

(२ )     तुकडोजीमहाराज कोणकोणत्या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत?

उत्तर: तुकडोजीमहाराज हिंदी, उर्दू आणि मराठी या भाषांतील कवने बेभान होऊन गात असत.

(३ ) तुकडोजीमहाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

उत्तर:तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहिला.

४) तुकडोजी महाराजांच्या आईवडिलांचे नाव काय होते

उत्तर :- तुकडोजी महाराजांच्या आईचे नाव मंजुळा आणि वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर असे होते

५) तुकडोजी महाराजांचा ‘राष्ट्रसंत’ या पदवीने गौरव कोणी केला ?

उत्तर :- भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा ‘राष्ट्रसंत’ या पदवीने गौरव केला

प्र. २ नावे लिहा :

१) तुकडोजीमहाराजांचे मूळ नाव – माणिक

२) तुकडोजी महाराजांचे गुरु – अडकोजी महाराज

३) रामटेकच्या जंगलात तुकडोजीमहाराजांनी केलेला अभ्यास – हठयोग

४) तुकडोजीमहाराजांनी लिहिलेल्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी – ग्रामगीता  

५) छोडो भारत घोषणा करणारे – महात्मा गांधी

६) भूदान चळवळ सुरु केली – आचार्य विनोबा भावे

७) पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपोषण करणारे – साने गुरुजी

प्र.२ का ते लिहा.

(अ) राजाने शिकार करण्याचे सोडले.

उत्तर:    प्राण्यांची शिकार करणाऱ्या राजाला तुकडोजी महाराजांनी त्याची चूक लक्षात आणून दिली. राजाला स्वतःची चूक कळून आली. आणि त्याने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आणि शिकार करण्याचे सोडले.

(इ) चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजीमहाराजांना ‘ देवबाबा म्हणत.

उत्तर:    तुकडोजी महाराज हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील स्वतःचीच कवणे खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासंतास डोलत असत. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना ‘देवबाबा’ म्हणू लागले.

(ई) राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजीमहाराजांचा ‘ राष्ट्रसंत ‘ पदवीने गौरव केला.

उत्तर:     सन १९४७ च्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने सहभाग घेतला. तसेच स्वच्छता, व्यसनमुक्ती , आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन यांसारखे उपक्रम त्यांनी राबवले. आचार्य विनोबा भावे यांनी सुरु केलेल्या भूदान चालवलीत भाग घेऊन त्यांनी भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत या पदवीने गौरव केला.

प्र.३.तुमच्या शब्दांत उत्तरे सांगा.

(अ)      श्री गुरुदेव सेवामंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले ?

उत्तर:    सन १९४७ च्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने सहभाग घेतला. यामध्ये हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. गुरुदेव सेवामंडळाने वेगवेगळ्या गावी सप्ताह, आयोजित केले. त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता, ग्रामोद्योग संवर्धन, आरोग्य संरक्षण यांसारखे अनेक उपक्रम राबवले.

(आ)   सानेगुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी काय केले?

उत्तर:     पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश दिला जात नव्हता. या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उप्ष्ण सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले.

(इ) राष्ट्रसंत तुकडोजीमहाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले?

उत्तर:     जपानमध्ये आयोजित परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली. त्या ठिकाणी अठरा देशांची जागतिक धर्मसंघटना गठीत करण्यात आली. त्या संघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले.

मुक्तोत्तरी प्रश्न

प्रश्न :- ‘अभयारण्य’ म्हणजे काय ?

उत्तर :- प्राण्यांना व पक्ष्यांना मुक्तपणे वावरण्यासाठी असलेले राखीव जंगल म्हणजे ‘अभयारण्य’ होय . तिथे कोणतीही भीती नसते म्हणून ते अभयारण्य होय .

स्वाध्याय – २

प्र . १ तक्ता पूर्ण करा :

 

तो – राजा     मुलगा तरुण मामा घोडा बैल देव

ती – राणी     मुलगी तरुणी मामी घोडी गाय देवी

प्र. २ . विरुद्धार्थी शब्द लिहा :

१) लहान X मोठा

२) समता X विषमता

३) हिंसा X अहिंसा

४) गरीब X श्रीमंत

५) तेजस्वी X निस्तेज

६) शुद्ध X अशुद्ध

७) उत्कृष्ट X निकृष्ट

८) स्वातंत्र X पारतंत्र्य

९) स्वदेशी X परदेशी , विदेशी

प्र . ३ पुढील वाक्याप्रचारांचा वाक्यात उपयोग करा :

१) निरुत्तर होणे – वाक्य : गुरुजींनी प्रश्न विचारल्यावर राज निरुत्तर झाला .

२) आत्मसात करणे : वाक्य: एकलव्याने , गुरु द्रोणाचार्याची मूर्ती समोर ठेऊन धरुन्विद्या आत्मसात केली .

३) गुजराण करणे – वाक्य : शेतकरी शेतात कष्ट करून आपले गुजराण करतो .

४) तल्लीन होणे – वाक्य : चित्र काढतांना रुद्र अगदी तल्लीन झाला .