11.राष्ट्ररक्षक मराठे // इयत्ता सातवी पाठ ११वा //Swadhyay STD7 history chap.11स्वाध्याय इयत्ता सातवी

१. कोण बरे?

 (१) अफगाणिस्तानातून आलेले ….

उत्तर:- पठाण

(२) हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले ….

उत्तर:- रोहिले

(३) नानासाहेब पेशव्यांचा भाऊ ….

उत्तर:- रघुनाथराव

(४) मथुरेच्या जाटांचा प्रमुख ….

उत्तर:- सुरजमल जात

 (५) पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे …

उत्तर:- पहिले माधवराव पेशवे

२. थोडक्यात लिहा.

(१) अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला

उत्तर :- १) नजिबखान हा रोहिल्यांचा सरदार होता . उत्तर भारतातील मराठ्यांचे वर्चस्व नजिबखान ला सहन होत नव्हते

२) नाजीब्खांच्या सांगण्यावरून अब्दालीने भारतावर पुन्हा स्वारी केली . अब्दालीने दिल्ली जिंकून घेतली . मोठी लुट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला

३) हि त्याची भारतावरची पाचवी स्वारी होती .

(२) अफगाणांशी संघर्ष:-

उत्तर:- १)  अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशह अब्दाली याला भारतातील संपत्तीचे आकर्षण होते . इ.स. १७५१ मध्ये त्याने पंजाबवर आक्रमण केले

२) मुघलांन अब्दालीच्या आक्रमणाची भीती होती . त्यामुळे बादशाहाने इ.स १७५२ च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांशी करार केला .

३) मराठ्यांनी या करारानुसार रोहिले, जात, राजपूत ,अफगाण इत्यादी शत्रूपासून मुघल सत्थेचे रक्षण करण्याचे मान्य केले .

४) छत्रपतींच्या वतीने पेशव्यांनी शिंदे-होळकरांच्या फौजा दिल्लीच्या संरक्षणार्थ पाठवल्या . हि बातमी पोहोचताच अब्दाली मायदेशी परतला

५) नजिबखानच्या विनंतीवरून अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला . दत्ताजी व अब्दाली यांची यमुनेच्या तीरावर बुराडी घाट येथे गाठ पडली . जोरदार लढाई झाली. परंतु या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले .

६) नंतर अब्दाली व सदाशिवभाऊ यांची पानिपतावर लढाई झाली . हि पानिपतची तिसरी लढाई होती . या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला . एक संबंध तरुण पिढी गारद झाली .

३) पानिपतच्या लढाईचे परिणाम:-

उत्तर :- १) पानिपतच्या युद्धात महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली

२) पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले

३) पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांच्या उत्तर भारतातील प्रतिष्ठेला जबर धक्का पोहचला

४) अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्याचा प्रभाव कमी झाला .

५) निजाम व हैदरअली यांनी मराठ्यांच्या मुलखावर आक्रमण करणे सुरु केले .

३. घटनाक्रम लावा.
(१) राक्षसभुवनची लढाई
(२) टिपूसुलतानचा मृत्यू
(३) माधवराव पेशव्यांचा मृत्यू
(४) पानिपतची लढाई
(५) बुराडी घाटची लढाई

उत्तर:- 

(१)बुराडी घाटची लढाई

(२) पानिपतची लढाई

(३) राक्षसभुवनची लढाई
(४)माधवराव पेशव्यांचा मृत्यू

(५)   टिपूसुलतानचा मृत्यू