स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र पाठ पाचवा मूलभूत हक्क भाग-२, Swadhyay mulbhut hakk bhag-2

१) लिहिते व्हा .

(१) धार्मिक कर लावण्यास संविधान प्रतिबंध करते .

उत्तर :- धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो , आणि भारत हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे त्यामुळे धार्मिक कर लावण्यास संविधान प्रतिबंध करते.

(२ ) संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय ?

उत्तर:- संविधानाने दिलेल्या मुलभूत हक्कांचा भंग झाल्यास, नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो , त्यालाच ‘संविधात्मक उपाय योज्नानाचा हक्क’ असे म्हणतात.

२ ) योग्य शब्द लिहा 

(१) बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण –

उत्तर :- देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण

(२) कोणत्या अधिकाराने हि कृती केली , असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश –

उत्तर:- अधिकारपृच्छ

(३ ) लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश –

उत्तर :- परमादेश

(४) कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविशायीचा आदेश –

उत्तर:- मनाई हुकुम किंवा प्रतिषेध

३) आपण हे करू शकतो, याचे कारण पुहे नमूद करा.

(१) सर्व भारतीय नागरिकांना सग्गळे सण आनंदाने साजरे करता येतात .

कारण  भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत.

(२) मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येत्ते.  

कारण भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना शेक्षणिक अधिकार दिलेले आहेत .

४ . रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे !

(१) हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते

(२) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही.