आदर्श राज्यकर्ता स्वाध्याय इयत्ता सातवी

प्रश्न. 1. पाठात शोधून लिहा.

1) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते ?

उत्तर :

अफजलखान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शायिस्ताखानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते.

2) शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे कोण ?

उत्तर :

शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जद आणि मदारी मेहेतर हे होत.

3) रोहिडखोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली ?

उत्तर :

रोहिडखोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली.

4) शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील ?

उत्तर :

शिवाजी महाराजांची स्वराज्यकार्याची आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढ्यांनाही आदर्श राहील.

प्रश्न. 2. लिहिते व्हा.

1) रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली ?

उत्तर :

i) शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असे. अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे.

ii) शायिस्ताखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिडखोऱ्याच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी त्या देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले.

iii) या कार्यास ‘एका घडीचा दिरंग न करणे’ असे त्यास बजावले.

iv) तसेच पुढे महाराजांनी त्याला सक्त ताकीद दिली की, ‘जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल’. अशी ताकीद रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना दिली.

2) शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते ?

उत्तर :

i) महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. जात धर्म, पंथ यांचा विचार न करता स्वराज्यात त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली.

ii) महाराजांनी आदिलशाहीतील जो प्रदेश जिंकला होता, त्या प्रदेशातील मुस्लिम धर्मस्थळांना अगोदर ज्या सवलती होत्या त्या पुढेही तशाच चालू ठेवल्या.

iii) शिवाजीमहाराजांच्या धार्मिक सहिष्णूतेबद्दल तत्कालीन इतिहासकार खाफिखान लिहितो, ‘शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता. की मोहिमेवर असतांना त्यांनी मशिदीला धक्का लावू नये. कुरआनची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी’. यांवरून शिवाजींचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे दिसून येते.

3) शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा.

उत्तर :

i) महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैनिकांना वेतन वेळेवर मिळावे तसेच ते राख रकमेत देण्यात यावे अशी व्यवस्था त्यांनी केली होती. महाराजांच्या मोहिमा झाल्यानंतर सैन्यास जे मिळेल ते त्यांनी सरकारात जमा करण्यात यावे, अशा प्रकारची लष्करास ताकीद होती.

ii) लष्कराने लढाईत मिळालेला ऐवज लपवून ठेवल्यास त्यास कडक शासन केले जाई. सैनिकांनी मोहिमांमध्ये पराक्रम केल्याबद्दल त्याचा सानसन्मानही केला जाई.

iii) लढाईत सैनिकाला वीर मरण आल्यास त्याच्या कुटुंबाच्या उदर निर्वाहाची ते काळजी घेत असत. त्याचप्रमाणे शत्रू सैनिक लढाईत शरण आल्यास त्याला चांगली वागणूकही ते देत असत. अशाप्रकारे शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण होते.

प्रश्न. 3. एका शब्दात लिहा.

1) स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी –

उत्तर :

दौलतखान

2) शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमीळ कवी –

उत्तर :

सुब्रमण्यम् भारती

3) बूंदेल खंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा –

उत्तर :

छत्रसाल

4) पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे –

 

उत्तर :

महात्मा जोतीराव फुले