९. कृषी इयत्ता ७वि स्वाध्याय मराठी मिडीयम
प्रश्न १. खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा.
(१) या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो.
(अ) सखोल शेती (इ) व्यापारी शेती
(आ) मळ्याची शेती (ई) फलोद्यान शेती
उत्तर – सखोल शेती
(२) शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय दया.
(अ) फक्त नांगरणे.
(आ) प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर.
(इ) फक्त मनुष्यबळ वापरणे.
(ई) फक्त पीक काढणे.
उत्तर – प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर.
(३) भारतात शेतीचा विकास झाला आहे, कारण…
(अ) भारतात शेतीचे दोन हंगाम आहेत.
(आ) बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत.
(इ) भारतात पारंपरिक शेती केली जाते.
(ई) भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.
उत्तर – भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.
(४) भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण ..
(अ) सुधारित बी-बियाण्यांचे कारख[1] 366;ने आहेत.
(आ) रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत.
(इ) लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.
(ई) आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.
उत्तर – लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.
प्रश्न २. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.
उत्तर-
१) शेतीस वर्षभर नियमितपणे पाणीपुरवठा होणे आवश्यक असते. पण भारतातील पाऊस ह&# 2366; हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे.
२) पिकांसाठी जेव्हा कृत्रिमरीत्या पाणीपुरवठा केला जातो. यालाच जलसिंचन म्हणतात.
३) विहिरीतील , हौदातील पाणी मोटेच्या साहाय्याने शेतीस पुरवले जाते
४) तसेच तुषार सिंचन , ठिबक सिंचन या तंत्रांचाही वापर केला जातो.
(२) जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा.
उत्तर –
* कालवे सिंचन :
१) नदयांवर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवून त्य& #2366;तील पाण्याच्या आधारे परिसरात कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते.
२) धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते.
३) कालवे सिंचन हा स्रोत सार्वत्रिक स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतोच असे नाही.
४) कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चीक पद्धत आहे.
* विहीर सिंचन :
१) जमिनीत मुरलेले पाणी विहिरी किंवा कूपनलिका खोदून मिळवले जाते व या पाण्याद्वारे जलसिंचन केले जाते.
२) विहिरी खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे ठरते.
३) विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याचा सुलभतेने वापर करता येतो.
४) विहीर सिंचन ही जलसिंचनाची कमी खर्चीक पद्धत आहे.
(३) शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.
उत्तर
१) निर्वाह आणि व्यापारी शेती हे दोन प्रकार आहेत.
२) सखोल शेती –
कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेतीप्रकार म्हणजे सखोल शेती.
* जास्त लोकसंख्येमु ;ळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते.
* या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते.
* या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते.
* या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते.
३) विस्तृत शेती –
* शेताचे क्षेत्र २०० हेक्टर किंवा अधिक असते.
* मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेती यंत्रांच्या साहाय्याने केली जाते. उदा., नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो.
* एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदा., गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, ओट्स, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात.
* या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. उदा., यंत्रखरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते.
* अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत.
* समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते.
(४) मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर –
* शेतीचे क्षेत्र ४० हेक्टर किंवा अधिक असते.
* शेतीचे क्षेत्र डोंगरउतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते.
* प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते, त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शí 5;ती आहे.
* या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदा., चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.
* या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहतकाळात (Colonial Period) झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.
* दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.
* मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत.
* या प्रकारच ी शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.
(६) भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय ? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत ?
उत्तर
१) भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण असे की येथे फक्त चार महिन्यांच्या कालावधीत च पाऊस पडतो. आणि भारतातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे.
२) बारमाही शेती करण्यात अडचणी –
* शेतीस पाण्याचा पुरवठा न होणे.
* भांडवल पुरेसे नसणे
* हवामानात अनियमितता अस णे